तंत्रज्ञानाचा समाजावरील परिणाम
हल्ली मुले स्मार्टफोनला चिकटून असतात म्हणून जे पालक चिंतित असतात त्यांच्या पालकांना तीसेक वर्षांपूर्वी टीव्हीचीही तशीच भीती वाटत होती. त्याआधीच्या पिढीतील तरुण मुले रेडिओमुळे बिघडतील अशीही भीती त्यांच्या पालकांनी व्यक्त केली होती. तंत्रज्ञानाविषयी लोकांची प्रतिक्रिया कशी बदलते त्याविषयी प्रतिभावंत विज्ञानकथालेखक डग्लस अॅडम्स यांनी सांगितलेल्या ठोकताळ्यांचा स्वैर अनुवाद काहीसा असा करता येईल: “तुमच्या बालपणापासून प्रचलित असलेले …